त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरातील प्रत्येक मंदिरात दिपोत्सव करूया

Google search engine
Google search engine

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी :

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सावंतवाडी शहरामध्ये प्रत्येक मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात यावा व यामध्ये शहरातील सर्व नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिर, आत्मेश्वर मंदिर, दत्त मंदिर, भटवाडीतील विठ्ठल मंदिर आणि शहरातील सर्व मारुती मंदिर या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करावा असे आवाहनही साळगावकर यांनी केले आहे.

यातील काही मंदिरामध्ये पूर्वीपासून त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव होत आहे. मात्र, शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून यावर्षीपासून प्रत्येक मंदिरामध्ये त्या त्या भागातील व्यवस्थापनाने दीपोत्सवामध्ये सहभागी व्हावे. यासाठी सर्व मंदिर व्यवस्थापनाला भेटून विनंती करण्यात येणार आहे. या दीपोत्सवामध्ये पारंपारिक पणत्या लावून दीपोत्सव करावा असेही आवाहन बबन साळगावकर यांनी केले आहे.

कुठेही मंदिरामध्ये मेणबत्तीचा वापर करण्यात येऊ नये. दिपोत्सवामध्ये महिला भगिनींनी मोठा सहभाग दर्शवावा व सावंतवाडी शहरातील या दिपोत्सवासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच प्रत्येकाने आपल्या घरातून कमीत कमी पाच पणत्या आणून मंदिरामध्ये लावण्याचे, आवाहन करण्यात आल आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Sindhudurg