व्यावसायिक सर्टिफिकेट कोर्समध्ये प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशनचे यश

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटराईज्ड अकाऊटिंग ॲण्ड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डेस्कटॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमांमध्ये सावंतवाडीतील प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटराईज्ड अकाऊटिंग ॲण्ड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु. तन्वी बंग (८३.२५ %) जिल्ह्यात पहिली, कु. अविष्कार वारखणकर (८१.७५ % ) जिल्ह्यात दुसरा, तर कु. कृपाली राऊळ ( ८१.२५ % ) जिल्ह्यात तिसरी आली. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांत कु. सेजल कुंभार (८९.७५ %) ही जिल्ह्यात पहिली व कु. दिपाली जंगले (८६.२५ % ) जिल्ह्यात दुसरी तर कु. शिवम धर्णे ( ८४.२५%) हा जिल्ह्यात तिसरा आला. सर्टिफिकेट कोर्स इन डेस्क टॉप पॅब्लिशिंग या अभ्यासक्रमात कु. भावेश जाधव ( ८५.५० % ) जिल्ह्यात पहिला, कु. मयुर घाडी (७९.०० % ) जिल्ह्यात दुसरा तर कु. मंजुश्री कशाळीकर ( ७७.०० % ) ही जिल्ह्यात तिसरी आली. या तीनही अभ्यासक्रमांसाठी संस्थेमधून ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

यात तेजस्वी गावडे, सुलोचना सावंत, किरण आरोसकर, शुभम सावंत, रोशनी गांवकर, अविस्कार वारखणकर, आंचल सावंत, सुफिरा मोगल, जगन्नाथ नाईक, रुपेश जाधव, ओमकार वडर, फरदिन शाह, प्राची देसाई, आराध्य माळकर, शार्दुल तळवडेकर, अनुजा सावंत, दिव्या पार्सेकर, सबुरी पाटणकर, मेहेक बेग, ग्रेटा अल्मेडा, सिया बांदेकर, सना शेख, सोहम सातावळेकर, शिल्पा मोदी, विद्याधर जाधव, प्रज्ञा कळंगुटकर, हर्षद नाईक, निरंजन नाईक, मिनल पटेल, साहिल राऊत, नागमाबानु सवनुर, रोहन मेस्त्री, रेणुका जाधव, देवेन्द्र सातावळेकर, आकाश गावडे, संजना कारिवडेकर, भावेश जाधव, मंजुश्री कशाळकर हे विद्यार्थी प्रथमश्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य संदिप देवळी यानी अभिनंदन केले आहे.