काजू -बी ला राज्य शासनाकडून हमीभाव देण्यात यावा

Google search engine
Google search engine

विरोधीपक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सौ.अर्चना घारे यांनी वेधले होते लक्ष

सावंतवाडी । प्रतिनिधी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ.अर्चना घारे यांनी काजू बी च्या हमीभावासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे लक्ष वेधल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना काजू दिला हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे.

तळ कोकणातील शेतकरी प्रामुख्याने काजू बी , सुपारी, नारळ उत्पादनावर अवलंबून आहे. या काजू – बी ला गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी भाव मिळत आहे. याबाबत राज्य शासनाने ठोस पावले उचलत या शेतकऱ्यांना दिलासादायक असा हमीभाव जाहीर करणे आवश्यक आहे. ज्यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य प्रमाणात उत्पन्न मिळेल. दिवसेंदिवस हवामानात होणारे बदल, गारपीट ,अवकाळी पाऊस यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यात हमीभाव नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास आपण दिलासा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रकाद्वारे केली आहे.

Sindhudurg