पेवे आमशेत भोईवाडी येथे एसटी बसचा अपघात

गुहागर : तालुक्यातील पेवे आमशेत भोईवाडी येथे सायंकाळी 5.15 च्या सुमारास गुहागर पेवे पांगारी एसटी बस चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यात तात्काळ हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले व उपचार करून घरी सोडले.सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याच प्रकारची नुकसान झाली नाही तसेच अन्य कोणाला दुखापत झाली नसून वाहक व चालक सुखरूप आहेत.

 

पेवे गावचे ग्रामस्थ दिनकर पारधी,खालीद खान सरगुरो,संदेश निवाते, विकास पडवळ, फराहान खान सरगुरो, मधुकर पडवळ, बाळकृष्ण पडवळ तसेच महिला वर्ग सायली पारधी,रश्मी पारधी,नम्रता निवाते, सुहासिनी पडवळ,नंदा निवाते यांनी दुखापत झालेल्या महिलांची चौकशी केली.तसेच ग्रामस्थांनी अपघातस्थळी वेळेवर पोहोचले व मदतकार्य केले.