अंजनवेल बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने माजी सरपंच यशवंत बाईत यांचा गौरव

Google search engine
Google search engine

Honoring former Sarpanch Yashwant Bait on behalf of Anjanvel Borbhatle, Katalwadi Gramstha Mandal

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळाच्या वतीने अंजनवेल येथील आदर्श व्यक्तीमत्व व नेतृत्व, माजी सरपंच यशवंत सोनू बाईत यांचा गौरव करण्यात आला. अंजनवेल कातळवाडी येथील ग्रामदेवता श्री उलाज काळेश्वरी सहाण येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अंजनवेल येथील माजी सरपंच यशवंत बाईत यांना सामाजिक शैक्षणिक, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ गोवा व अन्य संस्था यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला होता. हा पुरस्कार भारत सरकारच्या केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराची दखल घेऊन अंजनवेल बोरभाटले, कातळवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.