आंबव पोंक्षे गावात आयुष्यमान योजनेंतर्गत कार्ड वाटप

 

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेची विक्रमी विक्रमी नोंदणी करण्यात आली.या नोंदणीकृत ३६५ लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आले.याकामी आशासेविका सौ कुडतडकर यांनी मेहनत घेतली.

 

यावेळी ग्रामपंचायती तर्फे १३० ग्रामस्थांचे उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले.आयुष्यमान भारत योजनेचा लाभ व उत्पन्नाचे दाखले ग्रामस्थांना मिळाल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.
योजना प्रभावी पणे राबवण्यात सरपंच शेखर उकार्डे,उपसरपंच मंगेश मांडवकर व अन्य ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी मेहनत घेतली