कासे गावात कृषी दुतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजिक कासे गावात सावर्डे येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयातील कृषीछंद गटातील कृषिदूतानी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले.

 

कृषिदूतानी माकडं,वांदर यांना पळवून लावण्यासाठी तयार केलेली कमी खर्चातील बंदूक लक्षवेधी ठरली.कासे,कळंबुशी,पेढांबे,असावे व आजूबाजूच्या गावात वांदर व माकडांचा मोठा त्रास असतो.यावर ही बंदूक संजीवनी ठरत आहे.कृषी दुतांनी नेहमीच्या प्रत्यक्षिकाखेरीज वेगळं आणि उपयोगी प्रात्यक्षिक दाखवल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

यावेळी सौरभ गरुड,यश जाधव,महेश पाटील,शुभम पाटील,विश्वजित जाधव,प्रणव जांभळे,अथर्व गावडे,शुभम गायकवाड,राजवर्धन पाटील,रुंझान मुलाणी,ओंकार बाधगिरे,शंतनू पवार आदी कृषिदूत उपस्थित होते.तर सरपंच जगन्नाथ राऊत,उपसरपंच जनार्दन कातकर,दिलीप जोशी,दत्ताराम भुवड,रुपेश गोताड,रमेश कातकर,तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार जडयार उपस्थित होते.कृषिदूतानी कृषीदिनी शेतकऱ्यांना आधुनीक शेती विषयी मार्गदर्शन केले.