विधानभवनातून / संतोष वायंगणकर
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात दुसऱ्या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या… सकाळी विधानभवनाच्या पायऱ्या वर पहिल्यांदा सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हिंदू विरोधी वक्तव्य केले त्याविरोधात भाजपा महायुतीकडून निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. हिंदू विरोध करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध असो, हम सब हिंदू है, आदी घोषणाबाजी होत असताना महा विकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर येत घोषणाबाजी केली..तदनंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले. काल विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे आणि भाजपाचे आ. प्रसाद लाड यांच्यात सोमवारी शाब्दिक जुंपली होती त्यामुळे आज विधानपरिषदेत निश्चितच त्याचे पडसाद उमटणार हे निश्चित होते.
आज विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाले आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आ. प्रसाद लाड यांच्यात घडलेल्या प्रकाराने आ.अंबादास दानवे यांनी आ. लाड यांना सभागृहात शिवी घातली म्हणून विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी पाच दिवसासाठी आ.अंबादास दानवे यांना निलंबीत केले आहे. विधीमंडळाच्या इतिहासात विरोधी पक्षनेत्याच्या निलंबनाची पहिलीच घटना आहे. आ. अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवी दिली हे देखील पहिल्यांदाच घडल्याची चर्चा विधीमंडळ परिसरात होत होती.
राज्यपालांच्या अभिभाषणा नंतर मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना महायुती सरकारने कशा पध्दतीने जनतेला अभिप्रेत असलेले काम केले आहे. जनतेचा विश्वास आहे. जनतेत नकारात्मकता पसरवण्याच काम आमच्या विरोधकांनी केले असले तरीही जनतेने विश्वास आमच्यावरच पंतप्रधान मोदींवरच दाखवला आहे. शाळेतील विद्यार्थी यांच्या साठी जो ड्रेस देण्यात येत आहे. तो शालेय ड्रेसही मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सदस्यांना दाखवला.सभागृहात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही चर्चेदरम्यान अनेक मुद्दे उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्तरात सरकारच्या विविध योजनांची मांडणी जनतेच्या हिताचे निर्णय हे दाखवून दिले. विधानपरिषदेच्या ११ विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपणार असल्याने त्याची उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करावयाचे होते यामध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसा पर्यंत जर एक अर्ज मागे घेतला नाही. तर विधानपरिषदेच्या सदस्यासाठी निवडणूक होऊ शकते. शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे उमेदवारी अर्ज कोण मागे घेतो हे पहाण औत्सुक्याच ठरणार आहे