रिपाइंच्यावतीने रथयात्रेतून बाबासाहेबांचा विचार गावागावात पोहचवण्याचा प्रयत्न

Google search engine
Google search engine

बाबासाहेबांची 132 सावी जंयती अनोख्या उपक्रमांनी साजरी.

मंडणगड | प्रतिनिधी : . बाबासाहेब आंबडेकर यांची 132 सावी जंयती राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने साजरी करीत असताना रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने 14 एप्रिल 2023 हा आंबेडकरी अनुयांयांचा आनंदाचा दिवस अतिशय वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. बाबासाहेबांना केवळ कवटाळून बसू नका त्यांचे विचार व कार्य प्रत्येक तालुकावासीयापर्यत पोहचवण्याचे काम या निमीत्ताने हाती घेण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. यातून प्रत्येक समाज घटकास संर्घषाची प्रेरणा मिळावी हा उद्देश होता.

आंबडवे येथे स्मारकात बाबासाहेबांना अभिवादन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यासाठी कार्यकर्त्यांनी सजवीलेला रथ या यात्रेचे आकर्षण ठरला या रथात प्रतिक रुपाने बसलेले बाबासाहेब हे यात्रेचे दुसरे आर्कषण होते. आंबडवे येथून सुरु झालेली यात्रा देव्हारे मंडणगड शहर लाटवण अशी फिरली वाटेत येणाऱ्या सर्व गावातील लोकांचा रिपाइंच्या सर्व कार्यकर्त्यांनी लाडूचे वाटप करुन दिवस गोड केला. याचबरोबर बासाहेबांचे कार्यही समजावून सांगीतले लाटवण येथील कार्यक्रमानंतर ही यात्रा तालुक्यातील पहील्या दिक्षाभूमी असेलल्या टाकेडे या गावी पोहचली व येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यानंतर कादवण गावी जावून या यात्रेचा समारोप करण्यात आला. पार्टीचेवतीने आयोजीत कार्यक्रमात रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, दलित मित्र दादासाहेब मर्चंडे, तालुकाध्यक्ष नागसेन तांबे, तालुका सरचिटणीस रामदास खैरे, महिला तालुकाध्यक्ष प्रज्ञा दाभोळकर, जिल्हा संघटक विजय खैरे जिल्हा सदस्य किरण पवार, अऱविंद येलवे, संदेश खैरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील तांबे, सुरेश तांबे, संकेत तांबे, संदीप येलवे, स्वप्निल धोत्रे, विधान पवार, वीरेंद्र जाधव, मुराद तांडेल, आकाश पवार, अंकुश कासारे, सत्यम जाधव, संतोष कासारे, भाई कासारे, जितेंद्र जाधव विजय खैरे, स्वप्निल धोत्रे, संकेत तांबे, गौरव मर्चंडे, विरेंद्र जाधव या पदाधिकाऱ्यांसह गावागावातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

बाबासाहेब मनामनात पोहचवण्याच प्रयत्न – आदेश मर्चंडे,दलित, शोषीत, पीडीत समाज घटकास संर्घष करण्याची प्रेरणा बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून दिली वंचीत समाजघटकासाठी त्यांनी केलेले कार्य अलौकीक आहे. दुर्लक्षीत समाज घटकास मुळ प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्यांचे विचार व कार्य त्यांना कवटाळून चौकटीत बंद करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची समाजाला आजही गरज असल्याने त्यांचे कार्य व विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी जंयत्तीनिमीत्ती रथयात्रेचे आयोजन केले होते. त्यास तालुक्यातून उत्सर्फुत प्रतिसाद लाभला असल्याची प्रतक्रीया आदेश मर्चंडे यांनी दिली आहे