अभाविप प्रणित ॲग्रीव्हिजनचे १ ले कोंकण प्रांत संमेलन दापोली कोंकण कृषि विद्यापिठामध्ये संपन्न

Google search engine
Google search engine

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रणित ॲग्रीव्हिजन कोकण, कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट आणि डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आयोजित १ ले कोंकण प्रांत संमेलन विश्वेश्र्वरेया सभागृह दापोली येथे दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री मा.राहीबाई पोपेरे, मा.कुलगुरू डॉ संजय सावंत , विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य श्री विनायक काशीद,अधिष्ठाता डॉ बी जी देसाई,डॉ पी ए सावंत,डॉ संजय भावे,भारतीय किसान संघ प्रांत संघटन मंत्री श्री.चंदन जी पाटील,अभाविप कोंकण प्रांत सह मंत्री अमोल शिंदे,कोंकण प्रदेश संयोजक प्रथमेश रासकर, संमेलन सचिव डॉ प्रशांत बोडके, संमेलन संयोजक डॉ अमित देवगिरीकर,विद्यापीठ मंत्री प्रथमेश दिघे, यांच्या उपस्थित पार पडले. राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य अक्षय जंगम या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रशांत बोडके यांनी केले तर ॲग्रिव्हिजन परिचय श्री प्रथमेश रासकर,अभाविप परिचय श्री अमोल शिंदे यांनी केला. “देशी बियाणं प्रत्येकाच्या शेतात बांधापर्यंत गेलं पाहिजे,प्रत्येकाच्या घरात किचन गार्डन असल पाहिजे, प्रत्येकाच्या डब्यात घरच पिकवलेल पाहिजे.पैसे देऊन विष विकत घेऊन आजाराला बळी पडण्यापेक्षा सेंद्रिय शेती कडे वळले पाहिजे,नैसर्गिक शेती केली पाहिजे” असे पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधिले. मा कुलगुरू डॉ संजय सावंत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले. या संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोसेसिंग, मार्केटिंग व उद्योजकता साठी नवकल्पना डॉ नितीन पाटील यांनी मांडले. श्री चंदन पाटील यांनी सामजिक उद्योजकता या विषयाची मांडणी करून विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक कर्तव्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.या संमेलनात आभासी पद्धतीने अमेरिकेतून डॉ हर्ष किकेरे जी यांनी रोबोटिक आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध उद्योजकता यासाठी नवकल्पना मांडल्या. या कार्यक्रमात पोस्टर स्पर्धा व रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आले. या स्पर्धांमध्ये एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात एकूण २५ महाविद्यालय,०९ कृषी विद्यापीठातून एकूण ३४० विद्यार्थी १६ प्राध्यापक व ३४ शेतकरी महिला सहभागी झाले. संमेलन संयोजक डॉ अमित देवगिरीकर यांनी आभार प्रदर्शन करत वंदे मातरम् ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.