A film exhibition based on Ambedkar’s life is a guide to the youth: Deepak Kesarkar
सावली पाटकर मित्रमंडळ आयोजित चित्र प्रदर्शनाचे कौतुक
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी येथील सावली पाटकर मित्रमंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्र दाखवून येथील युवापिढीला दिशा देण्याचे कौतुकास्पद काम पाटकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील समाज मंदिर परिसराच्या बाजूला असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात या चलचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, मनोज नाईक, महेश पांचाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, बावतीस फर्नांडिस, हिदायतुल्ला खान, समन्वय समिती अध्यक्ष सुनील जाधव, केशव जाधव, भावना कदम, कांता जाधव, विनायक जाधव, सुरेश जाधव, विठ्ठल कदम, अमित जाधव, लाडू जाधव आदी उपस्थित होते.
Sindhudurg