ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत स्वराध्या पेडणेकर ने पटकाविले सुवर्णपदक…

Swaradhya Pednekar won gold medal in brain development exam…

वेंगुर्ले | प्रतिनिधी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायंगणी नं. २ ची विद्यार्थिनी कु. स्वराध्या निलेश पेडणेकर इयत्ता पहिली हिने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ९५ गुणांसह गोल्ड मेडल मिळविले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्वराध्याला वर्गशिक्षिका रसिका विनोद मांजरेकर तसेच तिचे आजोबा आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव कांबळी यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि वायंगणी ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे.