अभिनव फाऊंडेशन व ग्रामपंचायत मळेवाडतर्फे आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मळेवाड । प्रतिनिधी : शालेय मुलांना शिवकालीन युद्धातील साहित्य व साधने यांची ओळख व्हावी तसेच स्वसंरक्षण कसे करावे याची कला आत्मसात व्हावी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत मळेवाड कोंडुरे गावचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी व्यक्त केले.
अभिनव फाऊंडेशन व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रा. पं. सदस्य महेश शिरसाट यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी मुलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अभिनव फाऊंडेशन,सावंतवाडी व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युद्ध कला प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरासाठी श्री गजानन महाराज सेवा मंडळ मळेवाड यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थान समिती व पदाधिकारी यांचे मराठे यांनी आभार मानले.
फोटो – अभिनव फाऊंडेशन व मळेवाड ग्रामपंचायत आयोजित शिवकालीन युद्ध कला व स्वसंरक्षण शिबिरातील सहभागी विद्यार्थी
Sindhudurg