रत्नागिरी | प्रतिनिधी : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत येणाऱ्या अनुयायांसाठी भीम युवा पँथर संघटनेतर्फे कोकम सरबत वाटप उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या परिसरात स्टॉल लावून सुमारे साधारण ४० लिटर सरबतचे वाटप केले.
गेल्या वर्षांपासून भीम युवा पँथर संघटनेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. अशाच पद्धतीने यावर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांना सरबत वाटप उपक्रम राबवण्यात आला होता. विशेष म्हणजे संघटनेचे प्रमुख पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सरबत वाटप करण्यात येत होते. उन्हाच्या तडाख्यात अनुयायांची तहान या सरबताने भागविली. यावेळी प्रितम आयरे, अमोल जाधव, मंगेश जाधव, शशिकांत कांबळे, प्रविण कांबळे, समीर जाधव, योगिता जाधव, सुजीत चवेकर, राकेश कांबळे, उमेश कदम, योगेश जाधव, मंगेश पवार, संतोष सावंत, शरद सावंत, धीरज पवार, प्रशांत सावंत, आदी पदाधिकारी उपस्थित होते .