वैभवी पेडणेकर हिला कलारत्न पुरस्कार जाहीर!

Google search engine
Google search engine

Kala Ratna Award announced to Vaibhavi Pednekar!

१६ एप्रिल रोजी कट्टा येथे होणार पुरस्कार वितरण.

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे गावची कन्या आणि एस एस पी एम कॉलेज कणकवली या इंजिनिअरिंग कॉलेजची कॉम्प्युटर सायन्स ची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी कु.वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा कै. राजेंद्र ठाकूर गुरुजी कलारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिनांक 16 एप्रिल रोजी ओम साई गणेश मंगल कार्यालय कट्टा येथे सदर पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री.राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती मालवण श्री आप्पासाहेब गुजर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, प्राथमिक शिक्षक भरती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वैभवी हिला प्रदान करण्यात येणार आहे.

तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नुकताच वैभवी हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान 2023 हा राज्यस्तरीय पुरस्कार ठाणा येथे मिळाला होता.वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर ही मसुरे गावची कन्या असून आतापर्यंत तिला विविध तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच कराटे या क्रीडा प्रकारात तिने जिल्हा, राज्य, आंतरराज्य, स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केली आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये विविध गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, गरीब विद्यार्थ्यांच्या शालापयोगी गरजा पूर्ण करणे, अशा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य केले आहे. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला पाच गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्य म्हणून दत्तक घेतले आहे. तसेच शालेय क्रीडा प्रकार, कथाकथन स्पर्धा, काव्य स्पर्धा,नाट्य,नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये सुद्धा नावलौकिक प्राप्त केला आहे. वैभवी ही उत्कृष्ट महिला दशावतार नाट्य कलाकार आणि प्रसिद्ध नृत्यांगना सुद्धा आहे. तिच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कार्य असणाऱ्या अशा या संघटनेनेघेऊन तिला सन २०२३
चा कै. राजेंद्र ठाकूर गुरुजी कलारत्नपुरस्कार जाहीर करून अनोखा गौरव केला आहे. तिच्या या यशाबद्दल मसुरे गावात, आणि एस एस पी एम कणकवली कॉलेज कडून कौतुक होत आहे.