गावतळे येथे आ.योगेश कदम यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी : दापोली मतदार संघाचे आ. श्री.योगेश कदम यांच्या माध्यमातून गावतळे गावच्या विकासाकरीता विविध योजनेंतर्गत निधी मंजूर झाल्याने त्या सर्व विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन आ. योगेश कदम यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.

गुरववाडी हनुमान मंदिराकडून आरोग्य उपकेंद्राकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, गावतळे बसस्थानक ते दत्तमंदिर कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, गावतळे नळपाणी पुरवठा योजना, गावतळे येथे सभामंडप बांधणे, दत्तवाडी येथे विहीर बांधणे, बौध्दवाडी येथे नळपाणी योजना व विहीर बांधणे आदी विकास कामे आ.योगेश कदम यांनी मंजूर केल्याने गावतळेवासीयांनी त्यांचे स्वागत करत आभार मानले व कायम तुमच्या सोबत राहू असे आश्वासन दिले.

यावेळी तालुका प्रमुख श्री.उन्मेश राजे, क्षेत्र संघटक श्री.प्रदीप सुर्वे, माजी समाजकल्याण सभापती सौ.चारुता कामतेकर, सरपंच विधी पवार, संघटक श्री.प्रकाश कालेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.निलेश शेठ, माजी जि.प.सदस्य श्री.अनंत करबेले, युवा सेना तालुका प्रमुख श्री.सुमित जाधव, उपतालुका प्रमुख श्री.चंद्रकांत कामतेकर, युवाधिकारी श्री.विनय पवार, विभागप्रमुख श्री.उत्तम पवार, श्री.रामचंद्र पवार, श्री.वसंत पवार, श्री.प्रदीप म्हब्दी, श्री.सुरेश पवार, श्री.विजय पवार, आदी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.