मसुरे | झुंजार पेडणेकर : यशस्वी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आणि आडबंदरचे सुपुत्र श्री.आनंद मालाडकर यांचा संयुक्त विद्यमाने मुणगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ओला व सुका कचरा विलगी करणासाठी मोठे कचऱ्याचे डबे उपलब्ध करून देण्यात आले. प्रभाग क्रमांक एक, ग्रा सदस्या सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत, माजी उपसरपंच/सदस्य श्री.धर्माजी आडकर,माजी सरपंच सायली बागवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. उपकेंद्रातील वरिष्ठ आरोग्य सेविका श्रीमती पी. डी. जोशी, आशासेविका दुर्गा परब, अश्विनी मेस्त्री,अंकिता मुनगेकर,सुचित्रा मुनगेकर,आरोग्य सहायक श्री.कदम आदी उपस्थित होते.