जन शिक्षण संस्थान कडून गोळवन येथे शिलाई मशीन वाटप!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

मानव साधन विकास संस्था, संचलित
अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभु, जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग परिवर्तन केंद्र, गोळवण अंतर्गत
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून
गोवा विमानतळ प्रधिकरण- CSR निधीतून महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशिन समन्वयक संस्था – स्पॉटलाईट फाउंडेशन, गोळवण येथे शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यावेळी
स्पाँटलाईट फाउंडेशन गोळवण अध्यक्ष-मुकुंद पवार, उपाध्यक्ष- विरेश पवार, सचिव -शशांक पवार,मिताली परब, उर्मिला गावडे, समीक्षा गोळवनकर, समृद्धी राणे, सुहानी गावडे, रसिका पंडित, शलाका पवार, निमिशा पवार, कविता चव्हाण, जयश्री चिरमुले आदी लाभार्थी महिला उपस्थित होत्या.