कामगार मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश ताटे यांची उपस्थिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चातर्फे ”धन्यवाद मोदीजी !, अभियाना”चा शुभारंभ भाजपा कामगार मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष ताटे यांनी या अभियाना अंतर्गत भारत सरकारच्या माध्यमातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक जिल्ह्यात दिली जाणार असून लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे.या अभियानात फेब्रुवारी २०२४ पर्यंत २ कोटी लाभार्थ्यांशी त्यांच्या घरी जाऊन संपर्क साधला जाणार आहे . या अभियानासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ” *वन टू वन , हार्ट टू हार्ट* ” असा मंत्र दिला असल्याचे सांगितले . तसेच त्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चा कार्यरत असल्याच मत त्यांनी यावेळी व्यक्त करत उपस्थितांना योजनांबाबत मार्गदर्शन केले.
तर प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे कोकण विभाग अध्यक्ष वसंत सुतार, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष नारायण सावंत यांनी मनोगत व्यक्त करत धन्यवाद मोदीजी अभियानाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश तांबे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव, प्रदेश सरचिटणीस सोशल मीडिया प्रमुख हणुमंत लांडगे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत महाडीक, प्रदेश उपाध्यक्ष विनोद शहा, कोकण विभाग सचिव मंगेश चव्हाण, कोकण विभाग उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे कोकण विभाग अध्यक्ष वसंत सुतार, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष नारायण सावंत, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद भोगावकर, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी नगरसेवीका दिपाली भालेकर , बांदा मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, शक्ती केंद्र प्रमुख विनोद सावंत, कुणकेरी सरपंच विश्राम सावंत, दिलीप भालेकर, संजय सावंत, वेंगुर्ले सरचिटणीस प्रशांत खानोलकर, यतीन गावडे, विनोद सावंत आदि उपस्थित होते.
Sindhudurg