संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील बोरगाव मोरेवाडी येथील शिवबा मित्र मंडळाचे जेष्ठ सल्लागार, एक नाट्य कलाकार, माजी उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते यशवंत सीताराम मोरे यांचे बुधवार 12 एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.यशवंत मोरे जेव्हा मुंबईतून गावी आले तेव्हा त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. परखड बोलणे आणि प्रंचड ज्ञानाचा खजिना असल्याने कुठल्याही विषयावर ते सहज बोलत असत. त्यांनी गावच्या ग्रामपंचायती मध्ये पदार्पण करून माजी उपसरपंच पद भूषविले. त्यांनी अनेक विकास कामांना न्याय देत लोकविकास कामे केली.ते उत्तम नाट्य कलाकार सुध्दा होते. त्यांनी जेष्ठ कलाकार मोहन वाघ, प्रभाकर पळशीकर, सविता प्रभुणे यांच्या सोबत काम केले होते. त्यांच्या जाण्याने निश्चितच एक मोठी पोकळी शिवबा मित्र मंडळात निर्माण झाली आहे.त्यांचे उत्तर कार्य दि. २३ रोजी होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी अशा परिवार आहे.