सुप्रसिद्ध बालशल्यचिकित्सक डॉ. वामन शिवेश्वरकर यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीचे सुपुत्र व कोल्हापूर स्थित सुप्रसिद्ध बाल शल्य चिकित्सक डॉ. वामन तथा किशोर शिवेश्वरकर यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.

डॉ. शिवेश्वरकर हे आपल्या अनुभव आणि रुग्णांप्रती असणाऱ्या आत्मियतेसाठी सर्वपरिचित होते. दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या लहान मुलांच्या शस्त्रक्रियेमध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य होते.

तीन दशकांहून अधिक असणारी त्यांची वैद्यकीय सेवा ही कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हजारो नवजात अर्भके आणि मुलांसाठी जीवनसंजीवनी ठरली आहे. अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्यामुळे त्याना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी (डॉ. स्वप्ना), मुलगा, मुलगी, जावई, वडील (मेजर सुभाष) आणि भाऊ असा परिवार आहे.

Sindhudurg