ताम्हाणे-कोसुंब मार्गां संदर्भात श्री.अमोल गायकर यांचे 18 एप्रिल रोजीचे उपोषण तूर्तास स्थगित 

Google search engine
Google search engine

Mr. Amol Gaikar’s hunger strike on 18th April in connection with Tamhane-Kosumb route suspended for the time being

ताम्हाणे पंचक्रोशीतील नागरिकांच्या लढ्याला यश

संगमेश्वर | वार्ताहर : सामाजिक कार्यकर्ते श्री.अमोल गायकर यांनी दि.1 एप्रिल रोजी अर्ज करून ताम्हाणे कोसुंब मार्गासंदर्भात दि.18 एप्रिल रोजी उपोषण पुकारले.हा मार्ग एवढा खड्डेमय असून या मार्गांवरून पावसाळी रहदारी होणे अशक्य होणार आता सुद्धा धोकादायक झालेल्या या मार्गांवर अपघात घडत आहे. ताम्हाणे पंचक्रोशीतील अनेक नागरिक,विद्यार्थी या मार्गांवरून ये-जा करीत असतात.सदर परिस्थिती लक्षात घेता हा विषय मार्गी लागला पाहिजे,ताम्हाणे कोसुंब मार्ग खड्डेमुक्त होऊन दुरुस्त झाला पाहिजे यासाठी श्री. गायकर यांनी उपोषण आयोजिले होते.

सन 2022 मार्च मध्ये याचं विषयांसाठी श्री.गायकर यांनी आंदोलन केले होते तेव्हा या मार्गांवरील भेटत टप्पा दुरुस्त केला होता. श्री.गायकर यांच्या उपोषणाच्या पत्रामुळे प्रशासनाला खडबडून जाग आली. निविदा कार्यवाही होऊनसुद्धा एवढे दिवस प्रलंबीत कामाला या उपोषणाचे गांभीर्य लक्षात घेता 11 एप्रिल 2023 रोजी कार्यारंभ आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी पर्यंत या कामास सुरवात करीत असल्याचे लेखी पत्र उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरुख कार्यालया कडून श्री. गायकर यांना देण्यात आले.मुख्य हे काम होणे महत्वाचे आहे यासाठी दिनांक 18 एप्रिल रोजी ताम्हाणे कोसुंब मार्गांवर संबंधित विभागाचे अधिकारी पहाणी करण्यास येण्याचे सांगितले.ताम्हाणे कोसुंब मार्गाचे काम दिनांक 26 एप्रिल पर्यंत चालू होईल या चर्चेअंती हे उपोषण तूर्तास स्थगित करीत असल्याचे तसेच या आंदोलनासाठी ताम्हाणे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुद्धा मोठा पाठिंबा दिल्यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे श्री. गायकर यांनी सांगितले.