साटवली पंचकोशी शिक्षण संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
लांजा | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठात एम एस सी गणित विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून मास्टर ही पदवी प्राप्त केल्याबद्दल विद्यापीठात वृंदा प्रभू सुवर्णपदक पटकावणाऱ्या लांजा तालुक्यातील साटवली गावच्या इरम रफिक कोंडकरी हिचा सापवली पंचकोशी शिक्षण संस्थेमार्फत गौरव करण्यात आला.साटवली येथील रा.सी. बेर्डे माध्यमिक विद्यालय व कै. सौ.श्रुतिका यदुनाथ बेर्डे ज्युनिअर कॉलेज त्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी असलेली इरम रफिक कोंडकरी हिने एम एस सी गणित विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून मुंबई विद्यापीठातर्फे वृंदा प्रभू सुवर्णपदकाचे मान पटकावला आहे .याबद्दल तिचा साटवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने यशोचित असा सन्मान करण्यात आला.
या गौरव समारंभाला संस्थेचे अध्यक्ष शशिकांत जाधव, संस्था चेअरमन महेश नारकर, संस्था सचिव आदेश आंबोळकर, खजिनदार युसुफ काझी ,संस्था सदस्य इर्शाद बरमारे ,अब्दुल रहीम रखांगी तसेच साटवली गावच्या सरपंच इरम बरमारे, ग्रामपंचायत सदस्य ,बेनी गावचे सरपंच परेश खानविलकर तसेच सत्येश्वर ज्ञान प्रसारक मंडळ हर्चेचे अध्यक्ष श्री मयेकर ,प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.