शाळेच्या स्टेज बांधणीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत…!

Google search engine
Google search engine

स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र. २ च्या माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र. २ च्या सांस्कृतिक सभागृहाच्या स्टेज बांधणीसाठी शाळेच्या सन १९९८-९९ बॅचच्या विद्यार्थ्यांनी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत केली. ही मदत मुख्याध्यापिका शुभांगी सावंत आणि शाळा व्यवस्थापन अध्यक्षा मयुरी मेस्त्री यांच्याजवळ सन १९९८-९९ बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुपूर्द केली. यावेळी श्रीमती तावडे, विश्वनाथ पोवार, प्रमोद पिळणकर, प्रमोद राणे, सखाराम राणे,भास्कर राणे, रुपेश आमडोस्कर, मीनल राणे, भूषण काणेकर, लक्ष्मण पिळणकर, हरिश्चंद्र आमडोस्कर, वैभव पाटकर, शीतल पिळणकर, प्रियांका पिळणकर, सुप्रियाराणे, सोनाली सावंत, शेखर केरकर, देवेंद्र परब, पुष्पा बाणे, वामन परब, मिलिंद तावडे हे उपस्थित होते. शाळेच्या सांस्कृतिक सभागृह स्टेज बांधणी व नूतनीकरणासाठी शाळेच्या शिक्षकांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सन १९९८-९९ बॅचच्या विद्यार्थ्यांनी आर्थिक स्वरुपात मदत केली.