Demand for construction of passenger shelter shed at Mandaki
चिपळूण : मांडकी गावातील कोष्टेवाडी, भटवाडी या ठिकाणी एस.टी बससाठी प्रवासी निवारा शेड उभारण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गातून केली जात आहे.
मांडकी गावामध्ये पहिली प्रवासी निवारा शेड बांधण्यात आली होती. ती कौलारू व जांभा दगड खांबावर उभी होती. काही वर्षांपूर्वी झालेल्या वादळ, पावसात ती शेड पडली. तेव्हापासून आजपर्यंत ती शेड उभारण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. शेड नसल्याने स्थानिक ग्रामस्थ, वयोवृध्द व्यक्ती, महिला तसेच विद्यार्थी यांना भर उन्हात रस्त्यावर उभे राहून एस.टीची वाट पाहावी लागत असून सर्वांचेच हाल होत आहेत. या रस्त्याने चिपळूण पालवण, चिपळूण तुरंबव व्हाया वहाळ, चिपळूण मुर्तवडे, चिपळूण भातगाव-आबलोली अशा अनेक एस.टीच्या फेऱ्या सुरू असतात.