तिसगाव पूर्व विभागाच्या वतीने दिनांक 22 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवनाचा ७ वा वर्धापन दिन व संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन!

Google search engine
Google search engine

On behalf of Tisgaon East Division on April 22, Dr. Babasaheb Ambedkar Samaj Bhavan’s 7th Anniversary and Joint Jubilee Program!

जयंतीनिमित्त लोककलावंतांचा सन्मान सोहळा व कव्वालीच्या कार्यक्रमाचेही आयोजन!

चिपळूण l प्रतिनिधी : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, तिसगाव पूर्व विभाग गट क्रमांक २ स्थानिक व मुंबई, तसेच माता रमाई महिला मंडळ तिसगाव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी पिंपळी खुर्द येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवनात समाज भवनाचा सातवा वर्धापन दिन आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध , महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती तथा तिसगाव विभागाचे अध्यक्ष मनोहर मोहिते तर स्वागताध्यक्ष तिसगाव विभाग मुंबईचे अध्यक्ष सुनील मोहिते हे भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम हे उपस्थित राहणार आहेत . तसेच अभिवादन सभेकरता प्रमुख वक्ते म्हणून मंडणगड येथील साहित्यिक – लेखक किशोर कासारे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमास चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती मुंबई मुख्य कमिटीचे अध्यक्ष विठोबादादा पवार, सरचिटणीस हरिश्चंद्र पवार, संस्थेच्या स्थानिक कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, चिटणीस सुहास पवार, तिसगाव विभाग मुंबईचे माजी अध्यक्ष शांताराम गमरे, माजी अध्यक्ष सुभाष कांबळे, अशोक मोहिते, विभागाचे सरचिटणीस नारायण जाधव, नायदान समितीचे अध्यक्ष दिलीप मोहिते, धम्म समितीचे अध्यक्ष अनंत पवार, उपाध्यक्ष संजय मोहिते गुरुजी, शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश पवार, प्रकाश गमरे, तिसगाव विभागाचे मुंबईचे चिटणीस सचिन गमरे, पिंपली खुर्दच्या सरपंच सौ अंजली जांबुर्गे, पोलीस पाटील दिपाली बागल, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ उज्वला गायकवाड , तंटामुक्त समिती पिंपली खुर्दचे अध्यक्ष श्याम देवरुखकर, पिंपली खुर्द शाखेचे अध्यक्ष अनिल कदम, आनंदा ससाने , कृष्णा पवार, मधुकर मोहिते यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार व रोहित कांबळे हे करणार आहेत.

यावेळी सकाळी दहा वाजता धम्म ध्वजारोहण, साडेदहा वाजता धम्म गाथा पठण, साडेअकरा वाजता चहापान व तदनंतर दुपारी बारा वाजता जाहीर अभिवादन सभा व लोककलावंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तिसगाव विभागातील लोककलावंत ज्येष्ठ जलसाकार, कव्वालीकार, प्रबोधनकार यांचा सन्मान ,गौरव केला जाणार आहे. दुपारी दोन वाजता स्नेहभोजन होणार असून सायंकाळी चार वाजता महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. रात्री नऊ वाजता प्रबोधनाकरिता कव्वालीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे . यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक नंदकुमार पवार आणि पार्टी मुंबई व कोकणची नागिन, भिमाची वाघीण कुमारी तेजल जाधव आणि पार्टी मुंबई यांच्यामध्ये हा कव्वालीचा सामना होणार आहे . या कार्यक्रमास विभागातील तसेच तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागाचे सरचिटणीस नारायण जाधव यांनी केले आहे.