Meeting in the Ministry regarding Contribution Fund of Credit Institutions, Special invitee to Adv. Deepak Patwardhan
महाराष्ट्रातील पतसंस्थांच्या अंशदान व तरलता सहाय्य निधी संदर्भाने या अधिवेशनात चर्चा झाली होती त्यामध्ये ठरल्याप्रमाणे या विषयावर मंत्रालयामध्ये माननीय सहकारमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार दिनांक 19 एप्रिल रोजी बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीसाठी एडवोकेट दीपक पटवर्धन यांना वैयक्तिकरित्या निमंत्रित करण्यात आले आहे या बैठकीमध्ये पतसंस्थांनी देण्याचे अंशदान व पतसंस्थांच्या ठेवींना मिळणारे संरक्षण यावर चर्चा होणार असून पतसंस्थांचे विविध प्रश्न हाताळणाऱ्या एडवोकेट दीपक पटवर्धन विशेष निमंत्रित म्हणून सन्मानपूर्वक बोलावण्यात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून सध्या त्यांच्यासमोरील अंशदानाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर अडवोकेट पटवर्धन आपली अभ्यासपूर्ण मते मांडून पतसंस्थांना न्याय देतील व पतसंस्थातील ठेवींना संरक्षण प्राप्त व्हावे यासाठी यामध्ये ठोस निर्णय होईल असेअपेक्षित आहे असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी केले