कणकवलीच्या तत्कालीन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांकडून सत्कार.!

Vaishali Rajmane, the then district officer of Kankavli, was felicitated by the mayor and deputy mayor.

कणकवली : कणकवलीच्या प्रांताधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत असणाऱ्या वैशाली राजमाने यांची सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर बदली झाल्यानंतर त्यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी भेट घेत त्यांचा सत्कार केला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी म्हणून लोकाभिमुख काम केल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक देखील केले..