राजापूर | प्रतिनिधी :
राजापूर तालुक्यातील ससाळे बौध्दवाडी येथील गणेश तांबे या युवकांने हरणा सारखा दिसणाऱया गेलया या प्राण्याच्या पिल्लाचे प्राण वाचविले असुन ते पिल्लू वनविभागाच्या अधिकाऱया सुखरूप पोहचविले.
गणेश तांबे हे नेहमी प्रमाणे आपल्या काजूच्या बागेत काजू जमा करणेसाठी गेले होते. त्यांच्या बागेतच आईपासून विभक्त झालेले गेलया जातीचे पिल्लू कावऱया बावऱया नजरेने पाहत इकडे तिकडे धावत होते. गणेशच्या लक्षात आले की हे पिल्लू आईपासून दूर झाले असून आईचा शोध घेत आहे. तर ओरडत असल्याने भुकने व्याकूळ झाले असल्याचे लक्षात आले. त्यांनी काहीवेळी त्या पिल्लाची आई येणाची वाट पहिली मात्र ती आली नसल्याने पिल्लाला उचलून घरी आणत त्याला दूध व पाणी पाजले. दोन दिवस त्याची काळजी घेत याची माहिती राजापूर वनविभागाला दिली.
यावेळी वनविभागाचे वनपाल सदानंद घाडगे, दिपक म्हादये, नितेश गुरव यांनी ससाळे बौध्दवाडीत जाऊन त्या पिल्लाला आपल्या ताब्यात घेतले. यावेळी वनपाल सदानंद घाडगे यांनी या पिल्लाची वैद्यकीय तपासणी करीत याचा अहवाल वरीष्ठ पातळीवर पाठविल्या नंतर निर्णय घेतला जाईल असे उपस्थितांना सांगितले.