Ambedkar Jayanti celebrations on 23rd April at Verle Samtanagar.
ओटवणे | प्रतिनीधी : वेर्ले, सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे पंचक्रोशी आयोजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२वा जयंतीत्सोव येत्या रविवारी म्हणजे २३एप्रिल रोजी वेर्ले समतानगर येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असून या निमित्त दिवसभरात विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत. सकाळी ९वाजता ध्वजारोहण,९.३० त्रिसरण , पंचशील, बुद्ध पूजापाठ, १०वाजता अल्पोहार झाल्यानंतर ११वाजता जय भीम रॅली, १वाजता स्नेह भोजन, दू.३वाजल्यापासून जाहीर सभा व सत्कार सोहळा सभाध्यक्ष आयु. एकनाथ कदम,उद्घाटक प्रभाकर जाधव घावनळे हे मान्यवर बाबासाहेब आंबेडकर सामजिक क्रांती या विषयावर सभेला संभोदित करणार आहेत तर प्रमुख व्याख्याते ॲड. संदीप निंबाळकर सावंतवाडी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळ दशा आणि दिशा या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाने या जयतित्सोवाची सांगता होणार आहे. पंचक्रोशी तील सर्व परिवर्तनवादी अनुयायी आणि वेर्ले, सांगेली, कलंबिस्त, शीरशिंगे तेथील समाज बांधवांच्या सहकार्यातून पार पडणाऱ्या या उत्सवास उपास्थित राहण्याचे आवाहन पंचक्रोशीतील कार्यकर्त्यासह बौद्ध जन तरुण मंडळ समतानगर वेर्ले यांनी केले आहे