S. T. Success of Kankavali school number three in S exam.!
कु. वरद उदय बाक्रे १५८ गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ३९ वा.!
कणकवली : येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय शाळा कणकवली क्रमांक तीन चा इयत्ता सहावीचा विद्यार्थी कु वरद उदय बाक्रे २०० पैकी १५८ गुण मिळवून कु जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ३९ वा आला आहे तर इयत्ता सहावीच्या संतोषी सुशांत आळवे १५४ गुण गोल्ड मेडल, सम्यक चंद्रकांत पुरळकर १४६ गुण सिल्वर मेडल, किंजल जयवंत रेवाळे १२२ गुण ब्राँझ मेडल, व संजना सदानंद कांबळे ११२ गुण ब्राँझ मेडल मिळवले आहे त्यांना वर्ग शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल यांच्यासह अक्षया राणे व नितीन जठार यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता दुसरीच्या गौरेश संतोष सावंत १५२ गुण गोल्ड मेडल अनामी अमोल कांबळे १४८ गुण सिल्वर मेडल भार्गवी गणेश पारकर १४६ गुण सिल्वर मेडल संस्कृती जयवंत रेवाळे १२८ गुण ब्राँझ मेडल कश्यप विजय वातकर १२६ गुण ब्राँझ मेडल व हर्षाली निलेश चव्हाण ११४ गुण ब्राँझ मेडल मिळवले आहे त्यांना वर्गशिक्षिका श्रीमती अश्विनी साटम यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता तिसरीच्या मयंक रविकांत बुचडे यांने १३४ गुण सिल्वर मेडल प्राप्त केले आहे त्याला वर्ग शिक्षिका श्रीमती स्वाती कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका वर्षा करंबेळकर यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र सावंत उपाध्यक्ष सायली राणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे या सर्व विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून खूप कौतुक होत आहे.