आवळेगाव परिसरात मगरीचा वावर

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

स्वप्निल कदम | कुडाळ : चार दिवस पासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालिक्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथे पूर्वस नदी पात्रात मगरीचे दर्शन झाले आहे. एक भली मोठी मगर येथील शेतकरी संजय शशिकांत सावंत व गोपाळ सावंत यांच्या निदर्शनास आली. आवळेगाव परिसरात पहिल्यांदाच मगरीचे वास्तव्य असल्याचे समजल्यानंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

पूर्वस नदीजवळ शेतकामासाठी शेतकरी संजय सावंत गेले असता त्यांना नदीपत्रांमध्ये भली मोठी मगर निदर्शनास आली. याबाबत शेतकरी श्री सावंत यांनी गावातील स्थानिक प्रशासनास कल्पना दिली आहे. शेती लगतच्या नदीपात्रात मध्ये मगर आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्वरित मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.