वरवेलीत उत्कृष्ट बेंजो, वॉर्गन वादक राजेश करंदेकर, राकेश पडवळकर या कलाकारांचा सत्कार

Google search engine
Google search engine

Best Banjo, Organist Rajesh Karandekar, Rakesh Padvalkar felicitated in Varveli

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील वरवेली लोहार वाडी येथील नामवंत बेंजो व वॉर्गन वादक राजेश नरेश करंदेकर व पाटपन्हाळे गावचे नावाजलेले बेंजो वादक व गायक राकेश पडवळकर यांचा श्री हसलाईदेवी पालखी नृत्यकला पथकाच्या वतीने श्री हसलाईदेवी सहाण येथे सत्कार करण्यात आला. गेली अनेक वर्ष हे दोघेही बेंजो वादनाचे काम करत आहेत. या दोन कलाकारांनी लग्न, कव्वाली, हळदीचे कार्यक्रम, भजन, भारूड, तसेच नमन, नाट्य संगीत दिले आहे.यावर्षी त्यांनी पालखी नृत्याला चांगले संगीत दिले होते.श्रीहसलाईदेवी पालखी नृत्य कला पथकाला या दोन कलाकारांचे नेहमी सहकार्य लाभत असते या सत्कार कार्यक्रमाला अरविंद विचारे, विलास विचारे , पिंट्या नारकर, प्रसाद विचारे, विष्णु विचारे, अनिकेत शिंदे, सुदिप रसाळ, समीर महाडीक, मुन्ना किर्वे आदींसह इतर कलाकार उपस्थित होते.