पाचेरी सडा , येथील नैसर्गिक आपत्तीची गुहागर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

ग्रामस्थांनी मानले पदाधिकाऱ्यांचे आभार

        गुहागर l प्रतिनिधी : तालुक्यातील पाचेरी सडा बौद्धवाडी येथे डोंगर खचल्याने ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीची *गुहागर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या* पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी येथील ग्रामस्थांची चौकशी करून त्यांना मानसिक आधार दिला . तसेच सर्वांना सतर्क राहण्यासाठी आवाहन केले.

या ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. तसेच अन्य कोणत्या सोयी सुविधा येथील ग्रामस्थांना आवश्यक आहेत याची माहिती घेतली. त्यानुसार येथील नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यासाठी आलेले पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी श्री. प्रमोद केळस्कर, पाणीपुरवठा चे श्री. धोत्रे, मंडल अधिकारी श्री. काजरोळकर, येथील ग्रामसेवक श्री. पावरा यांच्याबरोबर येथील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी काढावा त्याचबरोबर त्यांना अन्य आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवाव्यात यासाठी चर्चा केली. त्यानुसार येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करून दिली असून येत्या दोन दिवसांमध्ये कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी गुहागर तालुक्याचे अध्यक्ष सुनील जाधव, महासचिव भूषण पवार, सचिव राजेश पवार, तसेच उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी सिद्धार्थ जाधव (गुरुजी), प्रसिद्धी प्रमुख उत्तम पवार, शैलेश गमरे आदी उपस्थित होते.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे येऊन भेट दिल्याबद्दल येथील ग्रामस्थांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.