चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालपदी रमेश राणे यांची निवड

Google search engine
Google search engine

Selection of Ramesh Rane as Expert Director of Chiplun Taluka Cooperative Buying and Selling Union

चिपळूण | प्रतिनिधी :  चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी कोळकेवाडी येथील रमेश राणे यांची नुकतीच निवड झाली आहे. ही निवड चेअरमन दिलीप माटे यांनी जाहीर केली आहे. या निवडीबद्दल आमदार शेखर निकम यांनी नुकतेच श्री. राणे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोळकेवाडी येथील रमेश राणे गेली काही वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिपळूण तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत असून यापूर्वी चिपळूण पंचायत समिती सदस्य पदाची यशस्वीपणे जबाबदारी संभाळीत प्रलंबित विकास कामे मार्गी लावली आहेत. याचबरोबर कोकण दिंडी समाज ट्रस्ट जिल्हा रत्नागिरी सचिव पदी कार्यरत आहेत.

तर आता चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, आमदार शेखर निकम यांनी त्यांचे नुकतेच अभिनंदन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वासराव सुर्वे, कोळकेवाडी तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम बंगाल, नाना शिंदे, सचिन शिंदे, श्रीधर शिंदे आदी उपस्थित होते.