आजचा दिवस कसा जाईल? 20 जुलै 2024 – शनिवार

आजचा दिवस कसा जाईल?
20 जुलै 2024 – शनिवार

मेष रास
आज वेळ काढून बाहेर फिरून या. तुमच्या प्रॉब्लेम वरचा उपाय सापडेल. आध्यात्मिक साधना करण्याने लाभ होईल. भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करा. कशातच मन लागणार नाही.

वृषभ रास
आज तुम्हाला दुःख सहन करावे लागेल. एखादी वाईट बातमी कळवू शकते. दुःखाच्या आणि रागाच्या भरात काहीतरी वचने देऊ नका. भलते सलते बोलू नका. त्रास कमी होण्यासाठी जवळच्या व्यक्तींची मदत घ्या.

मिथुन रास
आज तुमच्या आनंदावर पाणी पडेल. जिथे आहात आणि जे करत आहात त्यातच समाधान मानण्याचा, आनंद घेण्याचा प्रयत्न करा. एखादे काम होता होता राहील. एखादा प्रोग्राम अचानक कॅन्सल होऊ शकतो.

कर्क रास
आज कामे अर्ध्यात लटकतील. भेटीगाठी पुढे ढकलाव्या लागतील किंवा कॅन्सल होतील. घरात लक्ष द्यावे लागेल. सगळ्याच बाबतीत निराशा पदरी पडेल. नव्या पद्धतीने विचार करा. वेगळा विचार केल्यास फरक पडेल. पोटाचे त्रास होऊ शकतात.

सिंह रास
आज बेधडक काम करा. तुमच्या कल्पना इतरांना खूप आवडतील. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. भराभर कामे करावी लागतील. विचार न करता घाईत केलेल्या कामात यश मिळणार नाही. ऑनलाइन कामे करताना सावध रहा.

कन्या रास
आज तुमच्या सतत बदलल्यामुळे कोणतेही काम होणार नाही. एकावेळी एकच काम करा. घरात तुमच्या मदत न करण्यामुळे वादविवाद होतील. इतरांना तुमचा कंटाळा येऊ शकतो. नशिबाची साथ मिळेल परंतु त्यासाठी योग्य कर्म करा.

तुळ रास
आज तुम्हाला निर्णय घेताना अडचणी येतील. मन धुक्यात हरवल्यासारखे होईल. तुमच्या दृष्टिकोनातून सत्य इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करा. रिलेशनशिप्स वर परिणाम होईल. नात्यात नको ते अर्थ काढू नका. खोटेपणाचे परिणाम भोगावे लागतील.

वृश्चिक रास
आज तुम्ही स्पष्ट संवाद ठेवा. स्वतःच्या मनात फिरणाऱ्या विचारांमुळे इतरांशी तुम्ही असे काही विचित्र वागू शकता ज्यामुळे गैरसमज निर्माण होतील. “जगात प्रेम असे काही नसतेच” असे तुमच्याकडे पाहून वाटू शकते. अरसिकतेमुळे स्वतःसोबत इतरांना देखील बोअर करू शकता. एखादी बातमी वेळेवर न मिळाल्यामुळे नुकसान होईल.

धनु रास
आज नवीन संधी मिळेल. व्यवसायात लाभ होईल. पैशाचे प्रश्न सुटतील. हेल्थ मध्ये सुधारणा होईल. नवीन नोकरी मिळू शकते. एकूणच आनंदी दिवस.

मकर रास
आज तुमचे गोल्स पूर्ण करताना इच्छाशक्ती कमी पडेल. तुमचं मॅजिक आज चालणार नाही. आज फक्त फायद्यासाठी काम करू नका. प्रवास टाळा. देवाचे दर्शन घ्या अडचणी दूर होतील.

कुंभ रास
आज प्लॅनिंग फसेल. मदत मिळणार नाही. निर्णय घेण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकला जात आहे असे वाटेल. प्रोजेक्ट, काम, लांबणीवर पडेल. मनासारखे काम होणार नाही. हवा तेवढा वेळ मिळणार नाही.

मीन रास
आज विचार करण्यात वेळ जाईल. सतत कसले तरी टेन्शन जाणवेल. ज्याचा विचार देखील करण्याची गरज नाही अशा गोष्टींचे देखील तुम्ही टेन्शन घेऊ शकता. झोपमोड होईल. हेल्थ मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो.

@Ritikaslifetherapies
रितिका
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
++++++++++++++++++++++++++++