Cleanliness festival in the city on behalf of Mandangad Nagar Panchayat
मंडणगड | प्रतिनिधी : भारत सरकारचे स्वच्छ भारत मिशन अभियानाचे अंर्तगत देशभर स्वच्छते संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मंडणगड नगरपंचायतीचे माध्यमातून सखी महिला गृप यांचेकडून नगरपंचायतीचे आवारात नुकतेच जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. नगर पंचायत कार्यक्षेत्रातील नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने त्यांनी सुका कचरा, ओला कचरा व घातक कचरा वेगवेगळा करुन घंटागाडीमध्ये टाकण्याकरिता पथनाट्याद्वारे नागरीकांना संदेश देण्यात आला. यावेळी नगरसेविका राजेश्री सापटे, सेजल गोवळे, प्रमिला किंजळे, वैशाली रेगे, रेश्मा मर्चंडे, माजी नगराध्यक्षा श्रृती साळवी, यांच्यासह आजी माजी नगरसेविकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. सुनील जाधव यांनी महिलांच्या पथनाट्यास संगीत साथ दिली. स्वच्छतेची सार्वजनीक शपथ घेऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.