होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलच्या मधुरा पाटील हिला रौप्यपदक

Google search engine
Google search engine

Silver Medal to Madhura Patil of Patwardhan High School in Homi Bhabha Pediatric Science Competition

भटक्या जनावरांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प या विषयाची घेतली दखल

रत्नागिरी | प्रतिनिधी : महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी ५८ हजार विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये पटवर्धन हायस्कूलच्या इयत्ता सहावीतील मधुरा संजय पाटील हिला रौप्यपदक प्राप्त झाले आहे. चार फेऱ्यांमधून मधुराने चांगली कामगिरी करत यश मिळवले. रत्नागिरी परिसरातील भटक्या जनावरांचे पुनर्वसन या विषयावर तिने प्रकल्प सादर केला. हायस्कूलच्या पत्रकार परिषदेत मधुरासह वडील, मुख्याध्यापक, संस्था पदाधिकाऱ्यांनीही माहिती दिली. पटवर्धन हायस्कूलमधून इयत्ता सहावी व नववीसाठी १८ विद्यार्थी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत स्पर्धेसाठी प्रविष्ट झाले होते. यातून इयत्ता सहावीच्या गटातून तीन विद्यार्थी लेखी परीक्षेतून मधुरा पाटील, नित्या फणसे आणि ललित डोळ यांची पुणे येथे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली. यातून मधुराची तिसऱ्या व चौथ्या फेरीसाठी निवड झाली.

तिसरी फेरी कृती संशोधनाची होती. मधुराने रत्नागिरी परिसरातील भटक्या जनावरांचे पुनर्वसन हा विषय निवडला होता. तिला कोकण उपायुक्त (कै.) डॉ. विवेक पनवेलकर, मनोज गुंदेचा यांचे मार्गदर्शन लाभले. वडील संजय पाटील यांनीही परिश्रम घेतले. संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यवाह दादा वणजू, सहकार्यवाह श्रीराम भावे, संजय जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. अंतिम फेरीसाठी फक्त ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. चौथ्या टप्प्यात मधुराची मुलाखतही परीक्षकांनी घेतली आणि तिला रौप्यपदक प्राप्त झाले.चर्चगेट, मुंबई येथील एनएसडीटी महाविद्यालयाता स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. या वेळी मधुराला रौप्यपदक, शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र प्राप्त झाले. पटवर्धन हायस्कूलच्या यशाच्या कारगर्दीमध्ये मधुराने आणखी एक यशाचा शिरपेच रोवला. यापूर्वी असेच यश चिन्मयी मटागे हिने मिळवले होते. पटवर्धन हायस्कूलचे सर्व विज्ञान शिक्षक, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक वसंत आर्डे, पर्यवेक्षक सत्यवान कोत्रे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी मधुराचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.