कोकण अमृत बहुउद्देशीय कृषी प्रोडूसर कंपनी लांजा चा उपक्रम
लांजा | प्रतिनिधी : कोकण अमृत बहुउद्देशीय कृषी प्रोडूसर कंपनी लांजाच्या लांजाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मंगळवारी २५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत अजिंक्य मंगल कार्यालय लांजा येथे आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमांतर सकाळी दहा वाजता दीप प्रज्वलन, अकरा वाजता उपस्थित मान्यवरांचा सत्कार, दुपारी बारा वाजता सभासदांना शेअर सर्टिफिकेट वितरण, एक वाजता सर्वसाधारण सभा याप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. तसेच महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू, उत्पादने यांना मार्केट उपलब्ध करून देणेबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणेत आलेला आहे. तरी सदर प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे. इच्छुक महिला बचतगट, शेतकरी, आणि व्यवसाय करू इच्छिता आशा गटातील सदस्यांनी आपली नावे शनिवार दिनांक २२/०४/२०२३ रोजी पर्यंत संस्थेकडे कळवायची आहेत.संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण अमृत बहुउद्देशीय कृषी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष मंगेश वालकर ,सचिव रवींद्र खामकर ,कार्याध्यक्ष गोपीनाथ पवार ,खजिनदार चंद्रकांत दळवी व सर्व सदस्य पदाधिकारी मेहनत आहेत