विद्यमान चेअरमन नजीब मुल्ला यांच्या कुशल नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा व्यक्त केला विश्वास
लांजा | प्रतिनिधी : महाराष्ट्रासह गोवा ,आंध्र प्रदेश आणि गुजरात अशा चार राज्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या कोकण मर्कंटाईल मल्टी स्टेट को. ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणुक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. बॅंकेचे विद्यमान चेअरमन नजीब मुल्ला यांच्या कुशल नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.महाराष्ट्रासह गोवा ,आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यात विस्तारलेल्या आणि सुमारे ५४ हजार सभासद असलेल्या कोकण बँकेच्या ५० वर्षाच्या कालखंडात निवडणुकीची प्रथा मोडीत काढून सलग दोन वेळा बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडण्याचा करिष्मा विद्यमान चेअरमन नजीब मुल्ला आणि व्हाईस चेअरमन आसिफ दादन यांनी केला आहे.
सुमारे दोन हजार कोटी ची आर्थिक उलाढाल असलेल्या कोकण बँकेला विद्यमान चेअरमन नजीब मुल्ला यांनी गेली पंधरा वर्षात बँकेला प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे. युवा संचालकांना एकत्र घेऊन बँकेची घोड दौड पाहता सभासदांनी सलग दोन वेळा विश्वास व्यक्त करून निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडली आहे.समाजातील सर्वच घटकांना आणि सभासदांना विश्वासात घेऊन सोबत सन २०२३- २८ या कालावधी करिता नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे – नजीब मुल्ला ,आसिफ दादन, डॉ. शाहिद बरमारे,असगर डबीर,दिलीप मुजावर,बशीर मुर्तुझा, अल्ताफ काझी, ॲड. तसनीम काझी, फरीदा काझी, ॲड. मकबूल सुर्वे, डॉ. साजिद अधिकारी, फरहान वलाले ,मिलिंद कडलक, मोहम्मद नावेद रोगे (CA), रिझर्व बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर अब्दुल रशीद शेख, समीर मुल्ला हे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.कोकण बँकेची निवडणूक बिनविरोध होताच मुंबई येथे अनेक सभासदांनी एकच जल्लोष केला. अनेकांनी नवनिर्वाचित संचालकांवर फटाक्यांची आतिषबाजी करून अभिनंदनचा वर्षाव केला.