सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री देवी भराडी रवळनाथ देवस्थान निरवडे कोनापाल आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या निमंत्रित भजन स्पर्धेत तुळस वडखोल येथील सद्गगुरु भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. व्दितीय क्रमांक पिंगुळी येथील महापुरुष भजन मंडळाने तर तृतीय क्रमांक वैभववाडी येथील दत्तकृपा भजन मंडळाला मिळाला. तर उत्तेजनार्थ विभागून प्रथम मोरेश्वर भजन मंडळ, नेरुर तर व्दितीय विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, आंदुर्ले यांनी मिळावला. एकूण दहा संघ सहभागी झाले होते.
उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे –
वैयक्तिक बक्षिसांमध्ये उकृष्ट गायक प्रसाद आमडोसकर ( पिंगुळी) उकृष्ट हार्मोनियम ( राजेश गुरव) उकृष्ट पखवाज ( शुभम गावडे) उकृष्ट तबला ( गौरव पिंगुळकर) उकृष्ट झांजवादक ( चिन्मय लाड) उकृष्ट कोरस ( सद्गगुरुनाथ भजन मंडळ तुळस) उकृष्ट शिस्तबध्द संघ (गोठण भजन मंडळ वजराट ) या संघाला देण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,माजी सरपंच निरवडे सुभाष मयेकर, जालंधर परब, बाबी नेमळेकर, एकनाथ जाधव, शिवराम जाधव, संतोष माळकर , प्रशांत मेस्री रुपेश मयेकर, सतीश वारंग, आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून रुपेंद्र परब व योगेश प्रभू यांनी काम पाहिले तल सूत्रसंचालन सतीश वारंग यांनी केले.
फोटो –
निरवडे भजन स्पर्धेत विजेत्या सद्गगुरु तुळस वडखोल मंडळाला गौरविताना परिक्षक योगेश प्रभू रुपेंद्र परब सुभाष मयेकर व इतर मंडळाचे कार्यकर्ते.
Sindhudurg