राजापूर Breaking : कोदवली येथे खासगी बस आणि कारचा भीषण अपघात

Google search engine
Google search engine
बालकासह कारमधील सहाजण गंभीर जखमी

राजापूर | प्रतिनिधी :कोदवली येथे कोदवली वीज उपकेंद्र समोर खाजगी आराम बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मध्ये एका लहान बालकाचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम बसला मुंबईकडून गोवा दिशेकडे जाणारा खाजगी कारचालक समोरून जोरदार धडकला. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.

या अपघातात जखमी झाल्यांची नावे पुढीलप्रमाणे योगेश ज्ञानदेव मुंडे, साहिल स्वप्नील मुंडे, स्वप्निल राजू मुंडे , साक्षी योगेश मुंडे, अर्चना स्वप्नील मुंडे, कृष्णा गणेश दराडे रा. जालना यांचा समावेश आहे या अपघाताचे वृत्त कळतात अनेक स्थानिकानी अपघात स्थळी धाव घेतली व जखमीना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर कारमध्ये अडकून पडलेल्या कारचालकाला महत्प्रयासाने बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या रुग्णांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित मीना डॉ. लक्ष्मण शर्मा डॉ. मोनिका व उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी हलविण्यात आले आहे या अपघाताचे वृत्त कळतात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे