लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई
रत्नागिरी | प्रतिनिधी : सातबारा दुरुस्ती करण्याकरिता आणि भूखंडाचे सातबारा उताऱ्यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्याकरिता ३१ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खेडशी येथील मंडळ अधिकारी अमित जगन्नाथ चिपरीकर, वय 39, याला लाच रक्कम 31 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार यांचे पक्षकार यांचे नावावर असलेला सातबारा दुरुस्ती करण्याकरिता १० हजार रुपये तसेच त्यांचे इतर पक्षकर यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचे सातबारा उताऱ्यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्याकरिता 21 हजार रुपये असे एकूण 31 हजार रुपये लाच रकमेची अमित चिपरिकर यांनी मागणी केली होती. बुधवारी १९ एप्करिल रोजी ही 31 हजार रुपये लाच रक्कम 19/04/2023 रोजी स्वीकारली असता लाचलूचपत प्रतिबंधक विभाग – रत्नागिरी रंगेहाथ पकडले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई सुशांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, पोहवा/ विशाल नलावडे, पोना/ दीपक आंबेकर, पो. शि. हेमंत पवार, म.पो. शि. वैशाली धनावडे, यांनी केली
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय 49 वर्षें ,
▶️ *आरोपी-* 1. अमित जगन्नाथ चिपरीकर, वय 39, मंडळ अधिकारी, खेडशी, ता. जि. रत्नागिरी
▶️ **लाचेची मागणी* 45,000 /- रु.
▶️ *लाच स्विकारली* 31,000/- रू.
▶️ *हस्तगत रक्कम**31,000/- रु
▶️ *लाचेची मागणी -**
दि. 19/04/2023
▶️ *लाच स्विकारली -*
दि. 19/04/2023 रोजी. वा.
▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार यांचे पक्षकार यांचे नावावर असलेला सातबारा दुरुस्ती करण्याकरिता दहा हजार रुपये तसेच त्यांचे इतर पक्षकर यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचे सातबारा उताऱ्यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्याकरिता 21 हजार रुपये असे एकूण 31 हजार रुपये लाच रकमेची आलोसे चिपरिकर यांनी मागणी करून मागणी केलेली लाच रक्कम 31 हजार रुपये आज रोजी स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पुढील कारवाई चालू आहे…..
▶️ *सापळा पथक -* सुशांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, पोहवा/ विशाल नलावडे, पोना/ दीपक आंबेकर, पो. शि. हेमंत पवार, म.पो. शि. वैशाली धनावडे,
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*
मा.श्री. सुनिल लोखंडे,
पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिक्षेत्र
मा.श्री.अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि., ठाणे परिक्षेत्र
▶️ *आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी* – मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी.
—————————————-
*रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.*
संपर्क :-
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893
२) *श्री सुशांत चव्हाण, DYSP , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो.नं.9823233044
३) *श्री प्रविण ताटे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो. नं. 8055034343
4) *श्री अनंत कांबळे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो.न. 7507417072
३) टोल फ्री:- १०६४V
*चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू*(सदरचा मेसेज आपल्या सर्व ग्रुप्स मध्ये प्रसारित करावा ही विनंती)