भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरण मोहीमेत मोठा घोटाळा

Google search engine
Google search engine

A big scam in the sterilization and vaccination campaign of stray dogs

सत्ताधाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना बनविले जात आहे बळीचा बकरा

कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ नगरपंचायतीने भटक्या कुत्र्यांची निर्बिजीकरण व लसीकरणाची मोहीम घेतली १७ दिवसात ५०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली असा अहवाल दिला. पण या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचे दिसून येत आहे. कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेच्या नावाखाली नगरपंचायतीच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि मोहीम राबविणाऱ्या संस्थेला बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे असे कुडाळ नगरपंचायतीचे भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

कुडाळ नगरपंचायतीने दि. २६ नोव्हेंबर २०२२ ते दि. १२ डिसेंबर २०२२ या १७ दिवसांच्या कालावधीत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरण ही मोहीम राबविली या मोहिमेसाठी नगरपंचायतीच्या स्वनिधी मधून तरतूद करण्यात आली ही मोहीम झाल्यावर या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या जवळ दि. २१ मार्च २०२३ रोजी या मोहिमे संदर्भात १२ मुद्द्यांवर माहिती मागितली. या १२ मुद्द्यांपैकी फक्त नगरपंचायतीने राबविलेल्या मोहिमेतील किती कुत्रे पकडले, करारनामा, काही कुत्र्यांचे फोटो आणि शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पत्र दिले मात्र इतर महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती दिली नाही

माहिती लपवली का जाते?

ही माहिती देण्यासाठी मोठा कालावधी घेतला संपूर्ण माहिती दि. ६ एप्रिल २०२३ रोजी देण्यात आली. या माहितीनंतर पुन्हा पत्र व्यवहार नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याजवळ दि. ६ एप्रिल २०२३ रोजी केला जर मोहिमेमध्ये त्रुटी नाही तर माहिती का लपवली जात आहे? जर मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा नाही तर माहिती तात्काळ का दिली गेली नाही? असा सवाल आहे.

शस्त्रक्रिया झाली त्या केंद्राची क्षमता किती?

नगरपंचायत मार्फत भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण ज्या पर्यटन केंद्रामध्ये केले गेले त्याची क्षमता काय आहे? मुळात या पर्यटन केंद्राच्या खोल्या किती आहेत? प्रत्येक दिवशी ४० मर्यादित कुत्रे पकडले असे म्हटले आहे आणि या कुत्र्यांना दोन दिवस निगराणी खाली ठेवून तिसऱ्या दिवशी सोडण्यात आले. केंद्रातील दोन खोल्यांमध्ये प्रत्येक दिवशी कुत्रे आणि तीन दिवसांना सोडण्यात येणारे कुत्रे यामध्ये कुठेही मेळ बसत नाही. १७ दिवसांच्या या मोहिमेमध्ये ५०० कुत्र्यांच्या निम्म्यापेक्षा कमी कुत्रे पकडण्यात आले आहेत. असा दावा आहे. शहरातील नागरिक भरणा करीत असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टीच्या कराची उधळपट्टी यामधून केली जात आहे.

कर्मचाऱ्यांना बनविले जात आहे बळीचा बकरा?

आता ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी सत्ताधारी कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवत आहेत. या मोहिमेमध्ये नगरपंचायतीने कराड येथील व्हेट्स फॉर ॲनिमल्स या संस्थेची करार केला आणि निर्बीजीकरण व लसीकरण असे मिळून प्रति कुत्रा १ हजार ८९० रुपये आकारले आहेत. यासाठी नगरपंचायतीची नियंत्रण ठेवणारी यंत्रणा दिसून येत नाही. तसा पत्रव्यवहार दिसून येत नाही. यासाठी नियंत्रण समिती यामध्ये स्थानिक कुणी नाही. या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे असे प्रसिद्धी पत्रकात कुडाळ नगरपंचायतीचे भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी म्हटले आहे.