Satyanarayana Pooja on Monday by Chaturbhuj Mandal, Hatkhamba
रत्नागिरी | : सालाबादप्रमाणे चतुर्भुज मंडळ, हातखंबा तर्फे श्री सत्यनारायण पुजा सोमवार दि. २४ एप्रिल २०२३ रोजी तारवेवाडी होळीकुंठ, हातखंबा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण सहकुटूंब, सहपरिवार मित्र मंडळीसह पूजेला उपस्थित रहावे. पूजेच्या तिर्थप्रसादाची वेळ सायं. ४.०० ते रा. ९.०० वा. पर्यंत आहे. या प्रसंगी आपण तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती मंडळातर्फे अध्यक्ष श्री. सुभाष गोताड, चारवाडी प्रमुख श्री. विठ्ठल (भाई) तारवे, सेक्रेटरी श्री. शिवाजी सनगरे, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र डांगे यांनी तसेच सर्व तारवेवाडी, सनगरेवाडी, बोंबलेवाडी, वरची बोंबलेवाडी, डांगेवाडी गावकर, ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच चतुर्भुज मंडळ, हातखंबा यांनी केले आहे.
पूजेनिमित्त बहुरंगी नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी सादरकर्ते : श्री आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ, सनगरेवाडी, गण : यमाचे गर्वहरण गौळण : शृंगारीक नटखट गौळण व पेंद्यांची कमाल व मावशीची धमाल रावण नृत्य, गायक : योगेश सागरे, विकास सनगरे आदी मंडळी नमन सादर करणार आहेत. तरी याचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.