२३ रोजी माखजन मध्ये ‘शुभ्र सुगंधित मने’ कार्यक्रम

On 23rd, ‘Shubra Sugandhit Mane’ program in Makhajan

माखजन |वार्ताहर संगमेश्वर तालुक्यातील सांस्कृतीक् चळवळ जपणाऱ्या कलांगण परिवार व माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या सहयोगाने २३ रोजी सायंकाळी ५ वाजता शुभ्र सुगंधित मने हा सांगितिक कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम माखजन इंग्लिश स्कूल येथे गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे.या कार्यक्रमात शतकोत्तर रौप्य महोत्सवी संगीत शारदा या नाटकातील नाट्यप्रवेश आणि लोकप्रिय कवितांचे सांगितिक सादरीकरण होणार आहे.या मध्ये माखजन पंचक्रोशीतील काही मुले,ज्ञान प्रबोधिनी चिपळूण संपर्क केंद्रातील मुले हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या आगळ्या वेगळ्या सांगितिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन कलांगण चे निबंध कानिटकर व मा.पं.शि. प्र.मंडळ माखजन चे अध्यक्ष आनंद साठे यांनी केले आहे.