संगमेश्वरातील सोनवी पुलावर दोन कारचा अपघात

Google search engine
Google search engine

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानकाजवळील सोनवी पुलावर दोन कारचा आज गुरूवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाले. तर पुलावरच हा अपघात झाल्याने दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. संगमेश्वर पोलीसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

संगमेश्वर येथील सोनवी पूल अरुंद असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. काही दिवसांपूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्ता करण्यात आला. मात्र त्यानंतर या पुलाचे काम रखडले आहे. आज गुरुवारी सकाळच्या सुमारास संगमेश्वर येथील सोनवी पुलावर मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी कार आणि रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. अपघातानंतर वाहतुक काहीकाळ खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीसांनी घटनास्थळी जावून नागरिकांच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.