सावंतवाडी शहराला ‘स्मार्ट टाऊन’ घोषित करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : आमदारांच्या निलंबनाचा विषय सुप्रीम कोर्टात असला तरीही आमदारांचं निलंबन करायच की नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. सुप्रीम कोर्ट त्याबद्दल निकाल देवू शकत मात्र निलंबन करायच की नाही हा निर्णय अध्यक्षांचा आहे. तसेच सरकार स्थापन करण की पाडण हे विधानसभा ठरवते. त्यामुळे सरकार पडणार असं कुणी विधानसभेच्या बाहेर बोलत असेल, चर्चा करत असेल तर त्याला मी महत्व देत नाही, असा टोला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी लगावला.
सावंतवाडीचे सुपुत्र असलेले विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर रविवारी सावंतवाडीत खासगी दौऱ्यानिमित्त आले होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, सावंतवाडीच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहर हे ऐतिहासिक व नैसर्गिक दृष्ट्या भूरळ घालणार शहर आहे. या शहराशी आमचीही नाळ जोडलेली असून शहराला ‘स्मार्ट टाऊन’ म्हणून पर्यटन दृष्ट्या घोषित करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सावंतवाडी शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाश्वत उद्योग, इको टूरीझम, गोव्यापेक्षा चांगलं पर्यटन आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सहा महिन्यांत सिंधुदुर्ग, विशेषतः सावंतवाडी, वेंगुर्लेत विकास प्रकल्प आणण्याचा आपला प्रयत्न असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, उदय सामंत आदींच्या माध्यमातून यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे स्वागत करताना जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल
Sindhudurg