Samajbhushan Award to 17 persons on behalf of Bhimai Ambedkar Memorial at Sakedi
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
कणकवली | प्रतिनिधी : साकेडी येथे भिमाई आंबेडकर स्मारक च्या वतीने १७ जणांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आले.भिमाई स्मारकाचे संस्थापक आणि द. बुद्धिस्ट सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष संदेश जाधव यांच्या मार्गदर्शाखाली दोन दिवस डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी १७ जणांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आले.हे पुरस्कार कणकवलीचे तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
आर टी कांबळे -मुंबई, संजय जाधव -खेड,दत्ताराम कांबळे उर्फ जनीकुमार, मनाली वंजारी,कु.सिमा जाधव,रिना राणे,मिलींद जाधव,भिकाजी जाधव,सिध्दार्थ जाधव, समिधा वारंग, अरूण गाडे, डॉ.चंद्रकांत राणे,सिध्दार्थ तांबे,तानाजी कांबळे,राजेश कांबळे,दिपक कांबळे,विश्वनाथ कदम,राजेश पुरूषोत्तम कदम यांना पुस्कार देण्यात आले.या कार्यकर्माचे सुत्रसंचालन राजेश कदम, यांनी केले.











