बांदा (प्रतिनिधी) :
राज्य शासनाकडून देण्यात येणारा आनंदाचा शिधा डेगवे सोसायटीत प्राप्त झाला आहे. डेगवेतील शिधापत्रिका धारकांना सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई व मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
यावेळी भाजपाचे सरचिटणीस मधुकर देसाई, सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, सरपंच राजन देसाई, माजी सभापती भगवानराव देसाई, आबाजी सावंत, राजेश देसाई, सुर्याजी देसाई, जयवंत देसाई व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. शिधापत्रिका धारकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.